भरारी
पानवल्या डोळ्यातील स्वप्नांना
आज पहाते मी नव्याने
पूसलेल्या आठवणीना
जगते आहे मी नव्याने
विसावलेल्या वाटेवरूनी
धावुनी पहावे मी पुन्हा
नव्या पिढीची साथ देत
चालून पहावे मी पुन्हा
कितीदा आठवावा पराभव
नवी दिशा शोधावी पुन्हा
माया लावूनी जीवांना
जगन्या प्रारंभ करावा पुन्हा
शब्दांचे ऊंच मनोरे करू
उभा पुन्हा नव्याने
पंख पसरूनी घेऊ भरारी
जग जिंकण्या पुन्हा नव्याने