नवरात्रीच्या दिवसांत सारं वातावरण भारावलेलं असत. जगदंबा,अंबा,चतूश्रृंगी,सप्तश्रृंगी,दैत्यनिवारीनी,पद्मजा,कमलनयना,नारायणी ,गौरी,दूर्गा अशी किती वेगवेगळी रूप आपल्याला पहायला मिळतात. प्रत्येक माळेची वेगळी सजावट.रोजचा नवनवा नैवेद्य, रोजचा नवा श्रिंगार किती सुंदर असत सगळे. लोकं पहाटेच अनवाणी पावलांनी देवीच्या दर्शनाला लांबून जात असतात.पहाटेच सडा रांगोळी करून महिला
वर्ग देवीच्या दर्शनाला गर्दी करतो.खूप प्रसन्न वातावरण असते.अशा या शक्ती रूपाची स्तूती करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
कोल्हापूरची महालक्ष्मी एक आगळ रूपड नजरेत एकदा भरलं की कधीच उतरत नाही अशा या मातेला वदंन करून तीच्यावर शब्द सुमनंचा वर्षाव केला आहे.
करवीर निवासीनी
करवीर निवासीनी
सोज्वळ तूझे रूप
पाहता पडे प्रेमात
चढे अंगी नवा हुरूप
कंठी ,पेंड, बोरमाळ
लेवूनीया साजरी
करीशी गधा धारण तू
दैत्यांचा नाश करी
कवड्यांची माळा गळा
नजर स्थिरे लोचनी
नयनातून अग्नी बरसे
तू असे सत्यवचनी
म्हाळूंग हाती घेत
करिशी समृद्धीचा जागर
तूझ्या दर्शनाने आई
आनंदला जनसागर
सर्वांचे मंगल तू
करिशी अखंड माते
चरणी तूझ्या प्रार्थना
देवी तूझेच गूण मी गाते
महालक्ष्मी माते तूझा
दिप तेवू दे द्वारी
प्रकाश पसरू दे चहूकडे
जागृत राहू दे तुझी स्वारी
धन,धान्यं, सुबत्ता
तूझ्या पावलाने येई
सदैव असशी पाठीशी
आशिर्वाद तुझा आई
-सुप्रिया देवकर.
वर्ग देवीच्या दर्शनाला गर्दी करतो.खूप प्रसन्न वातावरण असते.अशा या शक्ती रूपाची स्तूती करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
कोल्हापूरची महालक्ष्मी एक आगळ रूपड नजरेत एकदा भरलं की कधीच उतरत नाही अशा या मातेला वदंन करून तीच्यावर शब्द सुमनंचा वर्षाव केला आहे.
करवीर निवासीनी
करवीर निवासीनी
सोज्वळ तूझे रूप
पाहता पडे प्रेमात
चढे अंगी नवा हुरूप
कंठी ,पेंड, बोरमाळ
लेवूनीया साजरी
करीशी गधा धारण तू
दैत्यांचा नाश करी
कवड्यांची माळा गळा
नजर स्थिरे लोचनी
नयनातून अग्नी बरसे
तू असे सत्यवचनी
म्हाळूंग हाती घेत
करिशी समृद्धीचा जागर
तूझ्या दर्शनाने आई
आनंदला जनसागर
सर्वांचे मंगल तू
करिशी अखंड माते
चरणी तूझ्या प्रार्थना
देवी तूझेच गूण मी गाते
महालक्ष्मी माते तूझा
दिप तेवू दे द्वारी
प्रकाश पसरू दे चहूकडे
जागृत राहू दे तुझी स्वारी
धन,धान्यं, सुबत्ता
तूझ्या पावलाने येई
सदैव असशी पाठीशी
आशिर्वाद तुझा आई
-सुप्रिया देवकर.