Tuesday, July 24, 2018

खाद्य एकादशी

बघता बघता एकादशीची
हौस सार्याचीं फिटली
उपवासाचे सोबत पदार्थांची
रेलचेल हायशी वाटली
खिचडी पापड शेंगदाण्याचे
डबे झाले खाली
दोन्ही वेळा फराळ खाऊन
पांडुरंग आपला वाली
केळी सफरचंद आणि खजूर
ताटात आणखी मावेना
तरीही अजून वाटते आहे
एकादशी पावेना
उद्याच्या जेवणाची चिंता
राञी झोपताना झाली
श्रिंखड पूरीने दिवसांची
सुरुवात छान झाली