Tuesday, October 25, 2011
aai
आई
आई तुझी आठवण आली की
आई तुझी आठवण आली की
मनसोक्त मला रडता येत
शांत वातावरणात मग मला
आनंदान बहरता येत
हळुवार तुझा स्पर्श आई
शहारून टाकी मजला
डोळ्यातील अश्रू माझ्या
भिजुन टाकी तुजला
झिजुनी चंदनासम आई
मधुगंध मज दिलास
घडविण्यास मज तू
दिवसरात्र एंक केलास
आई तुझ्यासाठीच ग
अजुनी आहे मी लहान
तुझ्या प्रेमाचीच मला
सदेव लागली आहे तहान
Friday, October 21, 2011
sasurvashin
सय येते तुझी माय
दूर देशी तुझी लेक
कासावीस जीव माझा
साद घाली तुला ऐक
अक्षतांचा वाहुनी भार
टाकले पाऊल दुसऱ्या दारी
मायेची सारी मानसं
मला जीव लावती भारी
पर तुझी ओढ मोठी
जन्मदात्री तू लाडकी
तुझ्या कुशीत ग शिरण्या
झाले केव्हाच मी पोरकी
आठवणीत तुझ्या रमताना
उमाळा दाटे माझ्या मनी
सासरी तुझी ग लेक
झाली आता फार जुनी
gandha premacha
गंध तुझ्या प्रेमाचा
दरवळे माझ्या मनी
तुझ्या प्रीतीचा उतसह
संचारला माझ्या मनी
डोळे तुझे भासतात
जणू सागर लहरी
जशी फुलपाखराची
फुलावर प्रीती गहरी
तुझ्या शब्दातील गोडवा
हृदयाशी भिडतो
जणू कारंज्यामधुनी
इंद्रधनू हा उडतो
सडा तुझ्या प्रेमाचा
अंगणी माझ्या पडे
तुझ्या मोहक हसण्यावारी
प्रीती हि माझी जडे
तुझं येण
उमललेल्या कळ्यांना
सांगायचय एक गाणं
तरुण मनात फुललेल
हळुवार तुझ येण
तुझ येण घराला
आनंद देऊन जात
तू कधी येणार आहेस
तुझी वाट पाहत राहत
तुझ्या येण्याने चोहिकडे
पसरलाय हा सुवास
प्रत्येक पावलागणिक
होत आहेत नवनवे आभास
तुझ्या येण्याने अंगणी
बहरला सोनचाफा
सात रंगाचा जणू
इंद्रधनुतील हा ताफा
Subscribe to:
Posts (Atom)