हरवून गेले ते दिवस
अन आठवणी स्थिरावल्या
बघ वळून मागे तू
उरल्या मागे त्या सावल्या
हरवून गेले ..................
होती अशी अंगणी फुले
गंध ज्याचा स्मरतो मला
उरल्याच होत्या आठवणी
भासे उजाड आता मला
हरवून गेले ..................
न्हवतीस तू तेव्हा कुठे
अन मीही नव्हतो माझा
शिशिरात जणू बहरे
कसा हा गुलमोहर ताजा
हरवून गेले ......................
होतीच वेडी स्वप्ने मनी
त्यांचा अर्थ न कळला कधी
आता हसुनी वेडावतो
त्या स्वप्नांना मी कधी कधी
हरवून गेले ते दिवस
No comments:
Post a Comment