थेंब पावसाचा आपल्याला सुखावून जातो . उन्हाळ्याने सारेच जीव हैरान झालेले असतात आणि चातकासारखे वाट पाहत असतात ती पावसाची . पावसाचे टपोरे थेंब अंगावर झेलताना होणारा आनंद अदभूत असतो
थेंब
पावसाच्या थेंबाच आयुष्य किती महानतहानलेल्या जीवाची भागते सारी तहान
इवलासा थेंब कधी भर्रकन मातीला भेटतो
अन कधी झाडाच्या फांदीला जाऊन थटतो
टपोरा थेंब कधी पानावर थांबतो
खळखळत मोठ्यांनी कधी गोष्टी सांगतो
अवखळ झऱ्याशी शर्यत लावतो
गप्पा मारत रानीवनी धावतो
थेंब थेंब होत होतोय जलाशय मोठा
थेंबानीच जुळवलाय पाण्याचा साठा
थेंब छोटा की मोठा जिद्द त्याची मोठी
तहानलेल्या साठी जणू अमृतच ओठी