वारकरी
अंतःकरण दाटलेशरण आलो देवा तुझ्या
तळमळतो जीव माझा
दर्शनासाठी तुझ्या साठवावे रूप तुझे
आठवावे सदा तुला
लोचनी नाम तुझे
हृदयात बसविले तुला
तहान भूक हरवली
भेटीसाठी तुझ्या देवा
धन्य होऊ दर्शनाने
मनी तुझ्या भक्तीचा ठेवा
सावळे रूप तुझे
किती ते मनोहर
श्रीहरी पाहता तुला
भारावले पंढरपूर
आषाढी कार्तिकी
वाट पाहती सारे जण
भक्तीरस दरवळे
धुंद झाली सारी मन
वारकरी भोळा तुझा
बळ दे माझ्या पाया
तुझ्या भेटीचा महिमा विठ्ठला
अंगी चढते नवी काया
No comments:
Post a Comment