Sunday, November 6, 2011

khel

खेळ

स्वप्नात माझ्या
तू येऊन गेलीस
स्वप्नांना माझ्या
तू रंग देवून गेलीस
असा  खेळ जीवघेणा
माझ्याशी खेळून गेलीस
आठवण तुझी येता डोळ्यात
आसवे देऊन गेलीस
माझ्या हसऱ्या चेहऱ्यावरती
दुखाची लकेर ठेवून  गेलीस
प्रीतीच्या सागरात मला
पुरता बुडवून गेलीस
स्वप्नात माझ्या तू
येवून गेलीस

te divas

हरवून गेले ते दिवस
अन आठवणी स्थिरावल्या
बघ वळून मागे तू
उरल्या मागे त्या सावल्या
हरवून गेले ..................
होती अशी अंगणी फुले
गंध ज्याचा स्मरतो मला
उरल्याच होत्या आठवणी
भासे उजाड आता मला
हरवून गेले ..................
न्हवतीस तू तेव्हा कुठे
अन मीही नव्हतो माझा
शिशिरात जणू बहरे
कसा हा गुलमोहर ताजा
हरवून गेले ......................
होतीच वेडी स्वप्ने मनी
त्यांचा अर्थ न कळला कधी
आता हसुनी वेडावतो
त्या स्वप्नांना मी कधी कधी
हरवून गेले ते दिवस

charolya

ठाऊक आहे मला तुझं
चातकासारख वाट पाहण
दूर दूर जाऊन सुद्धा
माझ्या जवळ राहाण

    आठवणींच्या विठामातीच
    घर मी जरूर बांधेन
    तुझ्याशी असलेल नात
    मी नेहमीच प्रेमान सांधेन

bandhan

बंधन
हे बंधन नसे नाजूक
ज्यास  पुरे हा नाजूक धागा
या गर्भरेशमी नटला
मिळे कुठे हि जागा
या धाग्यामध्ये गुंफुनिया
प्रेम वात्सल्य अन माया
मिळो अखेरापर्यंत
तुझ्या सहवासाची छाया
बघ ओव्लेत या धाग्यामध्ये
क्षण आपले हे आठवणीचे
तू ठेव तुझ्या स्मरणात
क्षण आपले हे साठवणीचे

Tuesday, October 25, 2011

aai

आई

आई तुझी आठवण आली की
मनसोक्त मला रडता येत
शांत वातावरणात मग मला
आनंदान बहरता येत
हळुवार तुझा स्पर्श आई
शहारून टाकी मजला
डोळ्यातील अश्रू माझ्या
भिजुन टाकी तुजला
झिजुनी चंदनासम आई
मधुगंध मज दिलास
घडविण्यास मज तू
दिवसरात्र एंक केलास
आई तुझ्यासाठीच ग
अजुनी आहे मी लहान
तुझ्या प्रेमाचीच मला
सदेव लागली आहे तहान

Friday, October 21, 2011

गंधाळल्या फुलांनी
शिंपिला ऋतू चांदण्यांचा
निःशब्द मनाच्या कोंदणात
चमकतो तारा तुझ्या प्रेमाचा

बरसुनी आल्या हास्यधारा
तुझे नयनकमल पाहुनी
गालावरती चढली लाली
तुला जवळी बाहुनी

उमलुनी आली प्रीतीलता
शहारे तन क्षणोक्षणी
भाराउनी गेल्या संवेदना
आगळीच भीती माझ्या मनी


sasurvashin

सय येते तुझी माय
दूर देशी तुझी लेक
कासावीस जीव माझा
साद घाली तुला ऐक

अक्षतांचा वाहुनी भार
टाकले पाऊल दुसऱ्या दारी
मायेची सारी मानसं
मला जीव लावती भारी

पर तुझी ओढ मोठी
जन्मदात्री तू लाडकी
तुझ्या कुशीत ग शिरण्या
झाले केव्हाच मी पोरकी

आठवणीत तुझ्या रमताना
उमाळा दाटे माझ्या मनी
सासरी तुझी ग लेक
झाली आता फार जुनी


gandha premacha

गंध तुझ्या प्रेमाचा
दरवळे माझ्या मनी
तुझ्या प्रीतीचा उतसह
संचारला माझ्या मनी
डोळे तुझे  भासतात
जणू सागर लहरी
जशी फुलपाखराची
फुलावर  प्रीती गहरी
तुझ्या शब्दातील गोडवा
हृदयाशी भिडतो
जणू कारंज्यामधुनी
इंद्रधनू हा उडतो
सडा तुझ्या  प्रेमाचा
अंगणी माझ्या पडे
तुझ्या मोहक हसण्यावारी
प्रीती हि माझी जडे


तुझं येण

उमललेल्या कळ्यांना
सांगायचय एक गाणं
तरुण मनात फुललेल
हळुवार तुझ येण

तुझ येण घराला
आनंद देऊन जात
तू कधी येणार आहेस
तुझी वाट पाहत राहत

तुझ्या येण्याने चोहिकडे
पसरलाय हा  सुवास
प्रत्येक पावलागणिक
होत आहेत नवनवे आभास

तुझ्या येण्याने अंगणी
बहरला सोनचाफा
सात रंगाचा जणू
इंद्रधनुतील हा  ताफा