#AD _व्यक्तीविशेष
एक दुपार अशीच...
दुपारची अडीचची वेळ मिरज जक्शनमध्ये एनसीसी कॅम्पला जान्यासाठी विस एक मुलींचा जथ्था ट्रेनची वाट पाहत बसला होता.अजुन काही मुली येऊन त्यांच्यात मिसळत होत्या.सगळ्याच युनिफॉर्म मध्ये असल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे जात होते. दुपारची वेळ असल्याने नेहमी गजबजलेल जक्शन थोडं शांत वाटत होते पण या चिमण्यांच्या कालव्याने तो निजलेला प्लाटफार्म जागा झाला होता.
जो तो येता जाता त्यांनाच न्याहाळत होता,त्याच्यांकडे कौतुकाने पहात होता.पंधरा दिवस रहाण्याचे लागणारे साहित्य, खाद्यपदार्थ आणि इतर सामानाची बॅग भरून हया चिमुरड्या त्यांच्या एनसीसीच्या शिक्षिकेसोबत जायला निघाल्या होत्या.काही जणी पहील्यांदाच निघाल्या होत्या त्यांचे पालक सोबत आले होते सोडायला.
इतका वेळ या मुलीचं सार्यांच आकर्षण ठरल्या होत्या तोच समोरच्या प्लाटफाॅर्मवरून मोठमोठ्याने टाळ्यांचा आवाज येऊ लागला.आवाज तसा लांब होता पण हळूहळू त़ो जवळ येऊ लागला तसे सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या.इतका वेळ चाललेला पोरींचा गलबलाट क्षणात स्तब्ध झाला.त्याही नवलाईने समोर घडणार पाहात होत्या.चारपाच साडी नेसलेल्या तृतीयपंथी व्यक्ती मोठमोठ्याने बडबडत ,टाळया वाजवत समोरच्या फलाटावर येऊन अगदी आमच्या समोर बसल्या.त्यांच्याकडे पाहताना लक्षात येत होते की हे खरेच तेच आहेत का?त्यांच्यातील एक तर दिसायला इतका रुपवान होता.इतके देखणे रुपडे होते की एक स्त्री असुन ही त्या रुपाचा हेवा वाटावा.मेकप केल्यामुळे तर एक चकाकीच आली होती त्याच्या चेहऱ्यावर.तोंडात पानमसाल्याचा तोबरा भरून असल्याने ती व्यक्ती काहीच बोलत नव्हती.भरलेला तोबरा थुंकुन त्याने बोलायला सुरुवात केली तेही टाळ्या वाजवत तसे सार्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
इतका वेळ कोनालाच वाटले नव्हते कि ती सौंदर्याची खाण असलेली जणू चवळीची शेंग ..ही तृतीयपंथी व्यक्ती आहे.खरच थोडावेळ वाटल की देवाने खरच खूप अन्याय केला तिच्यावर.पण पुन्हा मनात आले की माणसासारखे माणूस ते त्यांनी सुंदर असु नये का?
या जंक्शनवर ह्या व्यक्ती नेहमी दिसतात मात्र आज पाहीलेल्या व्यक्तीसमोर एखादी नटी देखील फिकी पडेल असे वाटत होते.फक्त आणि फक्त त्यांच्या या तृतीयपंथी लेबल मुळे कुठेतरी त्यांचं सौंदर्य झाकून गेलं होतं.त्यांच अस्तित्व लपून गेले होते.
आज समाजात अनेक अशा व्यक्ती आहेत ज्या सामाजिक बांधिलकी जपताना दिसुन येतात ज्या तृतीयपंथी आहेत.अशा व्यक्तींना प्रकाशात आणले पाहिजे.बर्याचदा काही ञास देणार्या व्यक्तीही आढळतात.टोलनाके,हाॅटेल, दुकानात जाऊन त्यांना काहीही बोलून पैसे लुटणार्या व्यक्ती देखील आहेत.
पण चांगली व्यक्ती नेहमी उठून दिसते तर वाईट व्यक्ती तिच्या गुणांनी मागे पडते.
असो आमच्या प्लाटफाॅर्मवर ट्रेन यायची अनान्सुसमेंट होऊ लागली तसे सारे पुढच्या प्रवासाला निघण्यास सज्ज झाले.माञ ती व्यक्ती मनात कुठेतरी घर करून गेली.
सुप्रिया.